A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सारे तसेच आहे हे

सारे तसेच आहे हे जेथल्या तिथे
नाहीस तू इथे रे, नाहीस तू इथे !

दाटून मेघ आले
अंगांग चिंब झाले
मन राहिले परंतु तुजविण हे रिते !

घालित हाक तुजला
फिरते दहा दिशांना
माझेच शब्द येती परतून मागुते

गेलास तू असा की,
गेले सरून मीही
येऊ नकोस फिरुनी इतुकेच मागते
गीत - वसंत निनावे
संगीत - यशवंत देव
स्वर- मंदाकिनी पांडे
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.