A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​श्रीकृष्णा सारंगधरा

​श्रीकृष्णा सारंगधरा । मी लाजुन धरते करा ।
चला नेते माझ्या घरा । उडवा रंग रंग रंग ॥

तुम्ही माझ्या महाली चला । ​​थाट विलासी केला भला ।
तुम्हा पचला तर उचला । सचला नंग नंग नंग ॥

आज महाली लाजुं नका । मनीं वाटेल तेवढं झुका ।
धरा लगाम ओढुनी पक्का । अगदी तंग तंग तंग ॥

म्हणे पठ्ठे बापुराव कवी । अनुभविक नवलाची ओवी ।
भरोशाची आहे काकवी । करूं नये भंग भंग भंग ! ॥

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.