A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्राता प्रभु सकलांचा

त्राता प्रभु सकलांचा ।
हा अंतरिंचा साचा दृढ भाव निरंतरचा ॥

नच जिवास आसरा । प्रभुवांचुनि दुसरा ।
घेतचि स्वजनांचा तो भार शिरीं सारा ॥
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.
शब्दाक्षराधिक्य आणि स्वराधिक्य या दोनही रचना-प्रकारांसाठी कवित्व सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने जोपासले गेले. स्वरप्रधान किंवा स्वराधिक्य असलेली पदे लिहिली गेली ती तालाच्या अंगाने म्हणजेच एखाद्या चीजेच्या वळणासारखी आणि आशयाने ढोबळ. त्यात भाव जोपासना कितपत झाली असेल, हा मुद्दा गौण ठरावा.

याउलट शब्दाक्षराधिक्य असलेली पदेही भावनेचा परिपोष साधणारी. आशयपक्वता असलेली अशी आढळतील.

स. अ. शुक्ल आदी भावगीतकारांनी नाटकांसाठीही रचना केल्या. त्या रचनांमध्ये, आलापाला वाव मिळेल, तालांचा सुरेख पेच पदाच्या मुखड्यासाठी तयार होईल इ. गोष्टी समोर ठेवून विचार झाला होता. अंतर्‍यामध्ये गायक नटांना गाण्यासाठी 'आऽकार' मिळण्याचीही सोय त्यांनी पद्यरचना करताना केली होती. अशा प्रकारची बंधने जेव्हा कवींवर पडली तेव्हा कवित्वामधील भावनेचे अंग अर्थातच कमी सकस राहिले.
याच कवींनी स्वतंत्रपणे केलेल्या गीतरचना मात्र त्यापेक्षा अधिक भावपूर्ण होत्या.
(संपादित)

यशवंत देव
शब्दप्रधान गायकी
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.