A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आधार तू जीवनी

सोनफूल तू, रानवेल मी
सोड हा अविचार तू
आधार तू, जीवनी आधार तू !

कोठली मी? तू कुणाचा?
योग आला दो जिवांचा
शून्य माझ्या अंतरीचा उजळला अंधार तू !

चांदण्याचा हा फुलोरा
रोमरोमी ये शहारा
दिवसरात्री उधळला रे आगळा शृंगार तू

तू विसावा प्राणनाथा
प्रीतीचा सौभाग्यदाता
सोनियाच्या पाउलांनी दिपविला संसार तू
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.