A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आईपण दे रे

आईपण दे रे, देवा, नवस किती करू?
फूल वेलीला येऊ दे, एक होऊ दे लेकरू

वांझपणाचं औक्ष असून-नसून सारखं
बाळावाचुनिया घर सर्व सुखाला पारखं

बाळा अंगीच्या धुळीनं ज्यांची मळतात अंगं
त्यांच्या होऊन दुनियेत कोण भाग्यवंत सांग?