A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज सरे मम एकाकीपण

आज सरे मम एकाकीपण
तेजोमय हो अवघे जीवन

उजळीत फुलवीत चराचराला
हदयी अजि रविराज उदेला
श्रांत विकल या मम जीवाला
तेज तयाचे दे संगीवन

असेच या पुढतीही देवा
वियोग अपुला कदा न व्हावा
ना तरी टाका तनू ही जाळून
जाऊ नका परि आता येथून
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर-
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.