आज एकान्तात हळवी वेदना
आज एकान्तात हळवी वेदना गंधीत झाली
अंगप्रत्यंगात हलके चांदण्यांची हाक आली
आर्जवी डोळ्यांत माझे गीत रेंगाळून होते
त्याच डोळी हळद ओली रात्र शृंगारात न्हाली
ती दिवा विझवून होती, मी पहाटे जागलो
ठेवुनी ओळी दिव्यांच्या ती पुढे मार्गस्थ झाली
एकदा हिरव्या ऋतूचा बहर स्वप्नांतून आला
हरवल्या दिवसास माझ्या साक्ष कवितेची मिळाली

गीत | - | अनिल कांबळे |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | पद्मजा फेणाणी-जोगळेकर |
गीत प्रकार | - | भावगीत |