A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज सुगंधित झाले जीवन

आज सुगंधित झाले जीवन
वसंत फुलले तव स्पर्शांतून

फुले सुगंधित लता सुगंधित
कोकिलकूजित कथा सुगंधित
सौख्य सुगंधित व्यथा सुगंधित
सुगंध सुटतो उच्छवासांतुन

गगन सुगंधित मेघ सुगंधित
स्थैर्य सुगंधित वेग सुगंधित
मम भाग्याची रेघ सुगंधित
सुगंध हिरवा झरे धरेतुन

हार सुगंधित जीत सुगंधित
उष्ण सुगंधित शीत सुगंधित
प्रीत सुगंधित गीत सुगंधित
सुगंध गळतो या नयनांतुन
उच्छवास - श्वास सोडणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.