आज तुजसाठी या पाउलांना
आज तुजसाठी, या पाउलांना, रे पंख फुटले
झनक झन झन्, मदिर सरगम, अधीर मन झाले
प्रीती अनोखी आली बहारा
देही नशेचा नाचे पिसारा
धुंदीत जग हे आता नहाले
आतुर धरणी भेटे नभाला
आता किनारा नाही सुखाला
नाते युगांचे फुलले निराळे
झनक झन झन्, मदिर सरगम, अधीर मन झाले
प्रीती अनोखी आली बहारा
देही नशेचा नाचे पिसारा
धुंदीत जग हे आता नहाले
आतुर धरणी भेटे नभाला
आता किनारा नाही सुखाला
नाते युगांचे फुलले निराळे
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | शूरा मी वंदिले |
राग | - | चंद्रकंस |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
मदिर | - | धुंद करणारा. |