आळवितां धांव घाली
आळवितां धांव घाली ।
ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥
ते हे यशोदेच्या बाळा ।
बरवी पाहतसें डोळां ॥२॥
विटेवरी उभी नीट ।
केली पुंडलिकें धीट ॥३॥
स्वानंदाचें लेणें ल्याली ।
पाहून दासी जनी धाली ॥४॥
ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥
ते हे यशोदेच्या बाळा ।
बरवी पाहतसें डोळां ॥२॥
विटेवरी उभी नीट ।
केली पुंडलिकें धीट ॥३॥
स्वानंदाचें लेणें ल्याली ।
पाहून दासी जनी धाली ॥४॥
| गीत | - | संत जनाबाई |
| संगीत | - | यशवंत देव |
| स्वर | - | आशा भोसले |
| गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, संतवाणी |
| धाली | - | संतुष्ट / तृप्त. |
| बरवा | - | सुंदर / छान. |
| लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले