आली रसाळ आंबेवाली
आली रे आली, अरे आली
आली रसाळ आंबेवाली
तारुण्याची वेल जणू ही
फलभारे वाकली
आंब्याहुनही मोहक कांती
गाली रसरसली
आंब्यामधल्या गाभ्याची
भाळी चिरी का रेखिली?
धुतली बाठी दिसे हनुवटी
किंचित ही वळली
चोच राघुची जणू नासिका
आंब्यावर टपली
फळाहुनीही हिच्या रुपाची
भूल मला पडली
आली रसाळ आंबेवाली
तारुण्याची वेल जणू ही
फलभारे वाकली
आंब्याहुनही मोहक कांती
गाली रसरसली
आंब्यामधल्या गाभ्याची
भाळी चिरी का रेखिली?
धुतली बाठी दिसे हनुवटी
किंचित ही वळली
चोच राघुची जणू नासिका
आंब्यावर टपली
फळाहुनीही हिच्या रुपाची
भूल मला पडली
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गोविंद कुरवाळीकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
चिरी | - | बारीक रेघ / कुंकू. |