A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आल्या नाचत नाचत

आल्या नाचत नाचत मेनका रंभा
आज अवतरली जशी इंद्रसभा

कानांत पाचुची कर्णफुले
कंठात हिर्‍यांची माळ रूळे
नवरत्‍न कटिवर चमचमले
जशी रवि-चंद्राची तेज:प्रभा

स्वर किन्‍नर गाती सप्त सुरां
दश दिशा उजळती रंग झरा
देहभान हरपले चराचरा
रसपान करीत नटराज उभा
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- बालकराम
चित्रपट - केला इशारा जाता जाता
गीत प्रकार - चित्रगीत
कटि - कंबर.
किन्‍नर - उपदेवता, देवलोकींचे गायक.
पाचू (पाच) - एक प्रकारचे रत्‍न.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.