A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंद मनीं माईना

आनंद मनीं माईना, कसं ग सावरूं?
घे गगन भरारी उडूं पाहे पाखरूं

भर दुपारची सावली
लपतसे जशी पाउली
मी बाळ तुझे माउली
सुख संयोगी रडणें, कसं ग आवरूं?

किती फुले लतेतळी गळली
किती पायदळी चुरगळली
खुडली ती उरलीसुरली
या जीवनी क्षण विरता डोळे पाझरूं

घे उडी मना घे उडी
आली रे मीलन घडी
दे सोडुनी दुबळी कुडी
बघतें तरी ये ममता छाया ही धरूं
लता (लतिका) - वेली.