A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आता उठवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्‍यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक करणार्‍यांची उडवू दाणादाण

शेतकर्‍यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

 

Print option will come back soon