A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आठवणी दाटतात

आठवणी दाटतात! धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे

विसरावे नाव-गाव आणि तुझे हावभाव
मूक भाव नजरेतील हृदयाला उमजावे!
आठवणी दाटतात!

रात्र अशी अंधारी, उरलेली संसारी
सोबतीस पहाटेस विरहाचे स्वप्‍न हवे!
आठवणी दाटतात!

स्वप्‍नातील जादु अशी, मज गमते अविनाशी
प्रेम तुझे सत्य गमे, त्यास कसे विसरावे?
आठवणी दाटतात!