A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अगदिंच तूं वेडी

अगदिंच तूं वेडी ।
वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥

बघसि न दूरवरी ।
स्वयंमन्य ते, व्यसनी-चंचल, बोधाचे वैरी ॥

म्हणसी मी शहाणी,
सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरुणी ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - शारदा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
पिसे - वेड.
मद - उन्माद, कैफ
स्वयंमन्य - आपलेच म्हणणे खरे म्हणणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.