A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अहो इथं मांडिला

अहो, इथं मांडिला इष्कबाजिचा अन्‌ श्रृंगाराचा हाट !
मोल पुरेसे मोजा आणिक, खुशाल लावा हात !

माल मांडला नवानवा
गाल नरम जणू गरम खवा
हा ओठाचा शराबपेला भरला कांठोकाठ !

नारिंगाची रसाळ जोडी
बघा रसरसे तयात गोडी
तुमचे जपतप फळास आले सुबक तयाचा घाट !

मदनधनूसम भुंवई छान
लखलखते नयनांचे बाण
काय हवे तुज बोल राजसा ! नको उद्याची बात !