A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजब सोहळा

अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा !

मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा !

किती काळ साहील?
किती मूक राहील?
वादळली माती करी वार्‍याचा हिंदोळा !

कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे आता बघ उघडून डोळा !