A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अमरपदाचे वैभव माझ्या

अमरपदाचे वैभव माझ्या गाण्याला लाभले
जीवन धन्य धन्य झाले !

महेशमूर्ती समोर दिसता
उचंबळे उरी सुस्वर-सरिता
धाव घेउनी तुम्हास मिळता, सर्व भरून पावले !

तुम्ही बोलविता, तुम्ही चालविता
तुम्ही हसविता, तुम्ही खेळविता
सूत्रधार तुम्ही, मी तर केवळ नादाचे बाहुले !

मायबाप तुम्ही, तुम्ही सद्‍गुरू
कृपा पिउनी हा फुले सूरतरू
तुम्ही दिले ते तुमच्या चरणी भक्तीने वाहिले !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.