अंबरातल्या निळ्या घनाची
अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला
मयूरा रे, फुलवीत ये रे पिसारा
जलधारेच्या वर्षावाने, हिरव्या कोमल अनुरागाने
वसुंधरेच्या श्वासाने हा गंधीत होई वारा
पानांचे मधुगीत गाउनी, थेंबांचे पदि नूपुर बांधुनी
रिमझिमणार्या तालावरती नर्तन करी लयकारा
मयूरा रे, फुलवीत ये रे पिसारा
जलधारेच्या वर्षावाने, हिरव्या कोमल अनुरागाने
वसुंधरेच्या श्वासाने हा गंधीत होई वारा
पानांचे मधुगीत गाउनी, थेंबांचे पदि नूपुर बांधुनी
रिमझिमणार्या तालावरती नर्तन करी लयकारा
गीत | - | वीणा चिटको |
संगीत | - | वीणा चिटको |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
अनुराग | - | प्रेम, निष्ठा. |