अंतरीच्या गूढ गर्भी
अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले
दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी, तू
रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले
एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते स्नेहतंतू आतले
शेवटी मंदावलेल्या वादळी वार्याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, ते गीत गाणे कोठले?
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले
दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी, तू
रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले
एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते स्नेहतंतू आतले
शेवटी मंदावलेल्या वादळी वार्याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, ते गीत गाणे कोठले?
गीत | - | ना. घ. देशपांडे |
संगीत | - | राम फाटक |
स्वराविष्कार | - |
∙
सुधीर फडके
∙ जी. एन्. जोशी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • स्वर- सुधीर फडके, संगीत- राम फाटक. • स्वर- जी. एन्. जोशी, संगीत- जी. एन्. जोशी. |
वंचना | - | फसवणूक. |