A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशी सखी सहचरी प्रणयिनी

अशी सखी सहचरी प्रणयिनी । शिवसुंदर मोहिनी
वरिन मी तीच जन्मयोगिनी

वीज कडाडे नयनी एका
दिठीत दुसर्‍या शरदचंद्रिका
सूर जिचे मज जाळित जाती आणि फुले कमलिनी
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.
चंद्रिका - चांदणे.
दिठी - दृष्टी.