अशीच अवचित भेटून जा
अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
स्वप्न सरावे आणि उरावी
काळी काजळरात
उरावी मागे काळी काजळरात
अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
तुफान दर्या चंदेरी रात
काठाला भिडली फेसाळ लाट
वादळ भरलंय् बाहेर आत
हातात दे ग तुझाच हात
पुरे दुरावा पुरे सजा
तुझाच मी ग तुझा तुझा !
अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
इंद्रधनूचे रंग विरावे
संध्येच्या तिमिरात
विरावे कैसे संध्येच्या तिमिरात
विफल झाली प्रीतीपूजा
दूर गेला नाथ माझा
कापत राहे ज्योती
वादळत्या प्रहरात
जपावी कैशी वादळत्या प्रहरात?
अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
मिठीत अलगद मिटून जा !
स्वप्न सरावे आणि उरावी
काळी काजळरात
उरावी मागे काळी काजळरात
अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
तुफान दर्या चंदेरी रात
काठाला भिडली फेसाळ लाट
वादळ भरलंय् बाहेर आत
हातात दे ग तुझाच हात
पुरे दुरावा पुरे सजा
तुझाच मी ग तुझा तुझा !
अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
इंद्रधनूचे रंग विरावे
संध्येच्या तिमिरात
विरावे कैसे संध्येच्या तिमिरात
विफल झाली प्रीतीपूजा
दूर गेला नाथ माझा
कापत राहे ज्योती
वादळत्या प्रहरात
जपावी कैशी वादळत्या प्रहरात?
अशीच अवचित भेटून जा
मिठीत अलगद मिटून जा !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | बाळ पार्टे |
स्वर | - | आशा भोसले, महेंद्र कपूर |
चित्रपट | - | मंगळसूत्र |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |