A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
औंदा लगीन करायचं (२)

पुनव पुसाची आली आता
साल सोळावं सरायचं
कुठवर चोरून फिरायचं.. औंदा लगीन करायचं !

आई कोण? बाबा कोण?
साक्षीदार पाहिजेत तीन
रस्त्यावरचं धरायचं
कुठवर चोरून फिरायचं.. औंदा लगीन करायचं !

सरकारात जाऊन, नावगाव लिहून
पाच रुपये तिथं भरायचं
साल सोळावं सरायचं
कुठवर चोरुन फिरायचं.. औंदा लगीन करायचं !

न्हाई मांडव, नको वर्‍हाड
पहिल्या रातीत नवं बिर्‍हाड
एकमेकांमधी मुरायचं
कुठवर चोरुन फिरायचं.. औंदा लगीन करायचं !