A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बदलती नभाचे रंग कसे

बदलती नभाचे रंग कसे !
क्षणांत निळसर, क्षणांत लालस, क्षण सोनेरी दिसे !

अशा बदलत्या नभाखालती
वसते अवनी सदा बदलती
कळी कालची आज टपोरे फूल होउनी हसे !

मेघ मघा जे लवले माथी
क्षणांत झाले धार वाहती
फूल कालचे फळ होऊनिया भरले मधुर रसे !

काल वाटले स्पर्श नच करू
त्या कीटाचे होय पांखरू
वेगवेगळे रंग तयाचे, इंद्रधनू उडतसे !
अवनि - पृथ्वी.
कीट - घाण / कीड.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.