A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बहरून ये अणु अणु

बहरून ये अणु अणु
जाहली रोमांचित ही तनू

नकळत मिळता नजरा दोन्ही
लहरत गेली वीज नसांतुनी
गेले बाई मी बावरुनी
किमया घडली जणू

उमलुन आली रात्र चांदणी
गंध दरवळे फुलावाचुनी
अंगांगावर लहर चंदनी
सुख लागे रुणझुणू

दंवापरी ते सुख टपटपले
ओठांनी या अलगद टिपले
आजवरी जे हृदयी जपले
तेच लाभले जणू