A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाई बाई असा पाहुणा कसा

बाई बाई असा, पाहुणा कसा,
दावतोय मुंबईचा लई झोक !
फिरलाय मळ्यात बिनधोक !

सखुच्या लग्‍नाला परवा
गावात राघु आलाय्‌ नवा
गावात ह्याचा हाय गवगवा
पोरींना बघतोय जवातवा
फुकाचा ठसा, रिकामा खिसा,
हातात रेडिओचं खोकं !
फिरलाय मळ्यात बिनधोक !

पाहुणा शेजारच्या घरचा
होणारा नवरा सुंदरचा
दावतोय नखरा वरवरचा
चावट पहिल्या नंबरचा
हिच्यासाठी जसा, झाला वेडापिसा,
हसतात गावातली लोकं !
फिरलाय मळ्यात बिनधोक !

मळ्यात मोत्या राखण करी
परवड त्याने केली पुरी
धावून त्याच्या अंगावरी
किंकाळी मारली मांडीवरी
वाघुळ जसा, जमिनीला तसा,
पाय झाले वर खाली डोकं !
फिरलाय मळ्यात बिनधोक !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.