A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाळा माझ्या नीज ना

जो जो गाई, अंगाइ गाते
बाळ माझ्या नीज ना !

ज्योत मंदावली
पेंगते साउली
पानोपानी वारा हलेना
बाळा माझ्या नीज ना !

पाऊलचाळा
घुंगूरवाळा
का नीज नाही राजा तुला?
इवल्या पापण्या शिणल्या ना?
बाळा माझ्या नीज ना !

डोळे फुलांचे मिटलेत बाई
ओठांत दाटून ये जांभई
बाळास माझ्या आता निजू द्या
काऊचिऊ या सारे उद्या !
बाळा माझ्या नीज ना !
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - हेमंत भोसले
स्वर - आशा भोसले
गीत प्रकार - भावगीत

 

Random song suggestion
This 👇 player works on all android and iOS devices also
  आशा भोसले