बांधले मी बांधले इंद्राचे तोरण
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले
उन्हाचे पाटव नेसले, टाकले
वार्याचे पैंजण घातले, फेकले
डोळ्यांत काजळ, केवडा अत्तर
लावले, पुसले
हर्षाचे हिंदोळे सोडले, बांधले
मयूर मनाचे रुसले, हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे
हासले, नाचले
दिसला, लपला चकोर मनाचा
फुलला, ढळला बहर चंद्राचा
लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा
विझले, तेवले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले
उन्हाचे पाटव नेसले, टाकले
वार्याचे पैंजण घातले, फेकले
डोळ्यांत काजळ, केवडा अत्तर
लावले, पुसले
हर्षाचे हिंदोळे सोडले, बांधले
मयूर मनाचे रुसले, हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे
हासले, नाचले
दिसला, लपला चकोर मनाचा
फुलला, ढळला बहर चंद्राचा
लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा
विझले, तेवले
| गीत | - | इंदिरा संत |
| संगीत | - | भास्कर चंदावरकर |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | सर्वसाक्षी |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| चकोर | - | चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी. |
| पाटव | - | विणलेले अच्छादन (वस्त्र). |
| हिंदोल (हिंडोल) | - | झुला, झोका. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले