A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बेधुंद या आसमंतात झाले

बेधुंद या आसमंतात झाले बेधुंद सारे तराणे
सजणा तुझ्यासवे !
ही रात प्रीत मोहरून गीत ये नवे
गीत ये नवे !

बेहोश वारा असा हा, गंधीत झाल्या दिशा
किती आठवणी मनी साठवुनी
आली शृंगारवेडी निशा ही
या अंबरात तेज न्हात तेवती दिवे
तेवती दिवे !

लाटांवरी चांदण्याचा दाटून आला थवा
झुले पाण्यावरी फुलवेडी परी
प्रीतरंगात ही रंगलेली
पानांत वाट शोधितात धुंद काजवे
धुंद काजवे !