भुकेला भक्तीला भगवान
रुद्राक्षांच्या नकोत माळा, नको त्रिकाळी स्नान
भुकेला भक्तीला भगवान
सेवून कण्या तो विदुराचा सौंगडी
त्या सुदाम्याचिया पोह्यांची आवडी
भावभक्तिचे तया आवडे एकच तुलसीपान
जो जेवु घालतो नामदेव विठ्ठला
दामाजीसाठी धेड हरी जाहला
जनी संगती दळितो, त्याला भक्तांचा अभिमान
एकनाथा सदनी विठ्ठल भरितो घडे
तुकयाची भोळी भक्ती त्या आवडे
वारकर्यांसह नाचू लागे भजनातही भगवान
भुकेला भक्तीला भगवान
सेवून कण्या तो विदुराचा सौंगडी
त्या सुदाम्याचिया पोह्यांची आवडी
भावभक्तिचे तया आवडे एकच तुलसीपान
जो जेवु घालतो नामदेव विठ्ठला
दामाजीसाठी धेड हरी जाहला
जनी संगती दळितो, त्याला भक्तांचा अभिमान
एकनाथा सदनी विठ्ठल भरितो घडे
तुकयाची भोळी भक्ती त्या आवडे
वारकर्यांसह नाचू लागे भजनातही भगवान
गीत | - | कवी सुधांशु |
संगीत | - | जयकुमार पार्ते |
स्वर | - | आर. एन्. पराडकर |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
धेड | - | अतिशूद्रांतली जात. |