छडी लागे छमछम
छम छम छम । छम छम छम
छडी लागे छम छम । विद्या येई घमघम
छम् छम् छम् । छम् छम् छम्
मोठ्या मोठ्या मिशा
डोळे एवढे एवढे लाल
दंतोजीचा पत्ता नाही
खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
तंबाखूच्या पिचकार्यांनी
भिंती झाल्या घाण
पचा पचा शिव्या देई
खाता खाता पान
"मोर्या मूर्खा ! गोप्या गद्ध्या !" देती सर्वां दम
तोंडे फिरवा पुस्ती गिरवा
बघु नका कोणी
हसू नका, रडू नका
बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम । "ओनमा सिद्धम्"
छडी लागे छम छम । विद्या येई घमघम
छम् छम् छम् । छम् छम् छम्
मोठ्या मोठ्या मिशा
डोळे एवढे एवढे लाल
दंतोजीचा पत्ता नाही
खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
तंबाखूच्या पिचकार्यांनी
भिंती झाल्या घाण
पचा पचा शिव्या देई
खाता खाता पान
"मोर्या मूर्खा ! गोप्या गद्ध्या !" देती सर्वां दम
तोंडे फिरवा पुस्ती गिरवा
बघु नका कोणी
हसू नका, रडू नका
बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम । "ओनमा सिद्धम्"
गीत | - | प्र. के. अत्रे (केशवकुमार) |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
चित्रपट | - | श्यामची आई |
गीत प्रकार | - | बालगीत, चित्रगीत |
पुस्ती | - | अक्षरांचा नमुना. |