चल ग हरणी तुरूतुरू
चल ग हरणी तुरूतुरू
चिमण्या उडती भुरूभुरू
भरभर भरभर पाय उचल
चल रानमळ्याची वाट धरू
हरणी माझी गुणी कशी
मळ्यात येशी रोज अशी
मी पण देते तुला खावया
हिरवा चारा पानभरू
ही सुनबाई पाहा तरी
कष्ट बिचारी किती करी
पहाटे पासून उसंत ना तरी
सासुबाई करीते कुरूकुरू
ह्या गावातील सुहासिनी
घाटावरती धुती धुणी
आला म्हणती माझा मुर्हाळी
दिसता कोणी वाटसरू
मोटकरी या पाटकरी
घ्या हो विसावा थोडा तरी
राव जराशी या चिलमीची
झुरके मारा झुरूझुरू
बसला वामन बांधावरी
हुरड्यासंगं न्याहारी करी
कुणा न देतो एकटाच खातो
तोंड काय चाललंय चुरूचुरू
चिमण्या उडती भुरूभुरू
भरभर भरभर पाय उचल
चल रानमळ्याची वाट धरू
हरणी माझी गुणी कशी
मळ्यात येशी रोज अशी
मी पण देते तुला खावया
हिरवा चारा पानभरू
ही सुनबाई पाहा तरी
कष्ट बिचारी किती करी
पहाटे पासून उसंत ना तरी
सासुबाई करीते कुरूकुरू
ह्या गावातील सुहासिनी
घाटावरती धुती धुणी
आला म्हणती माझा मुर्हाळी
दिसता कोणी वाटसरू
मोटकरी या पाटकरी
घ्या हो विसावा थोडा तरी
राव जराशी या चिलमीची
झुरके मारा झुरूझुरू
बसला वामन बांधावरी
हुरड्यासंगं न्याहारी करी
कुणा न देतो एकटाच खातो
तोंड काय चाललंय चुरूचुरू
| गीत | - | वामन कर्डक |
| संगीत | - | मधुकर पाठक |
| स्वर | - | श्रावण यशवंते |
| गीत प्रकार | - | लोकगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












श्रावण यशवंते