चल नाच नाच रे नंदकिशोरा
चल नाच नाच रे नंदकिशोरा
सूर मुरलीचा घुमव जरा
रुमझुम रुमझुम पैंजण वाजती
तालावरती गोपी नाचती
सुर स्वर्गातुनी कौतुक पाहती
आनंदाचा दिवस खरा
जललहरींचा नाच थांबला
अवखळ वायू मध्ये थबकला
कोकिळ गाई न गायनाला
काय जादू ही मुरलीधरा
सूर मुरलीचा घुमव जरा
रुमझुम रुमझुम पैंजण वाजती
तालावरती गोपी नाचती
सुर स्वर्गातुनी कौतुक पाहती
आनंदाचा दिवस खरा
जललहरींचा नाच थांबला
अवखळ वायू मध्ये थबकला
कोकिळ गाई न गायनाला
काय जादू ही मुरलीधरा
गीत | - | जी. के. दातार |
संगीत | - | नागेश मसुते |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
सुर | - | देव. |