चाल राजा चाल सर्जा
चाल राजा, चाल सर्जा, वेग थोडा वाढवा
सोनपंखी ऊन उतरे चाखण्यासी गारवा
ऊसमासाच्या सकाळी जोम अंगी दाटतो
नाद तुमच्या घुंगुरांचा मधुर भारी वाटतो
दूर सरतो रे धुक्याचा सरकपडदा आडवा
पिकत आला पार शाळू, पाचू पडला पांढरा
फूलतुर्याचा ऊस डोले, टंच हिरवा हरभरा
दरवळे रानी सुबत्ता भारले वारे, हवा !
शर्यतीची शान आता पायी तुमच्या येऊ द्या
पालखीवाणी परि ही बैलगाडी जाऊ द्या
आत बसल्या रानगौरी जाण याची वागवा
सोनपंखी ऊन उतरे चाखण्यासी गारवा
ऊसमासाच्या सकाळी जोम अंगी दाटतो
नाद तुमच्या घुंगुरांचा मधुर भारी वाटतो
दूर सरतो रे धुक्याचा सरकपडदा आडवा
पिकत आला पार शाळू, पाचू पडला पांढरा
फूलतुर्याचा ऊस डोले, टंच हिरवा हरभरा
दरवळे रानी सुबत्ता भारले वारे, हवा !
शर्यतीची शान आता पायी तुमच्या येऊ द्या
पालखीवाणी परि ही बैलगाडी जाऊ द्या
आत बसल्या रानगौरी जाण याची वागवा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | अशी ही सातार्याची तर्हा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
सरकपडदा | - | मागेपुढे करता येणारा पडदा. |
Print option will come back soon