A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चाललीस कुठं ग चंद्रावळी

चाललीस कुठं ग चंद्रावळी
सुरत सावळी साडी जांभळी, जांभळीच चोळी

उभार छातीवरी ठरेना पदर तुझा ग मुळी
चाललीस कुठं ग चंद्रावळी

पाठीवरती काळी नागिण खेळवीत मोकळी
चाललीस कुठं ग चंद्रावळी

भर तिन्हीसांजचं पिंपळ पारावरी
कोण पाहतो वाट तुझी सुंदरी
कां टाळ्या चिटक्या वाजवि वरचेवरी
कोण पाहतो वाट तुझी सुंदरी
तुझ्या मनाचं गुपित उमगली सारी आमुची आळी
आळी - गल्ली.
चंद्रावळी - चंद्राच्या अष्टनायिकांपैकी एक.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.