A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चांद किरणांनो जा जा

चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा
फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा

हळू चढा खिडकीत
पहा डोकावुनी आत
मूर्त माउलीची माझ्या न्याहळा जरा

पाडसाची चिंता माथी
करी विरक्तीची पोथी
डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे झरा

टांगलेली छायाचित्र
देवासारखे पवित्र
स्वर्गवासी माझे बाबा रक्षिती घरा

पलीकडे खाटेवरी
भर मध्यान्हीच्या पारी
दिव्यातळी भाऊराया वाची अक्षरा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - राम कदम
स्वर- आशा भोसले
चित्रपट - वैभव
राग - यमन
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.