A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चांदण्यात चालु दे

चांदण्यात चालु दे मंद नाव नाविका
तरंगती जलावरी संथ चंद्र-चंद्रिका

तूच साथ दे मला
तूच हात दे मला
तूच ने तुझ्यासवे मंत्रमुग्ध बालिका

भाव जे असावले
तुझ्यात ते विसावले
नकोस होउ रे कधी संगतीस पारखा
असावणे - अश्रुयुक्त होणे.
चंद्रिका - चांदणे.

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  ललिता फडके