चंदाराणी चंदाराणी का ग
चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी
शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चालचालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी?
वारा-वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी
काठी देखिल नसते हाती, थोडी नाही विश्रांती
चढसी कैसी, कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरसी
वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणुनीच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | जिव्हाळा |
गीत प्रकार | - | बालगीत, चित्रगीत |