A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चांदोबा चांदोबा भागलास का

चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी!

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?

आई बिचारी रडत बसेल
बाबांचा पारा चढत असेल!
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा, चांदोबा कुठे रे गेलास?
दिसता दिसता गडप झालास!
हाकेला 'ओ' माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हांला दिसशील का?
चिरेबंदी - मजबूत

 

  आशा भोसले, वर्षा भोसले