A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चिंचा आल्यात पाडाला

चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला !

माझ्या कवांच आलंय्‌ ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय्‌ पाणी
काय बघतोस राहुन आडाला?

मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वरखाली
फळ आंबुस येईल गोडाला !

माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या येडाला?