चित्र तुझे हे सजीव होऊन
चित्र तुझे हे सजीव होऊन येईल भेटीला
लागले पंख प्रीतीला
असेच भोळे असतील डोळे
केस कपाळी कुरळे कुरळे
रंग गुलाबी असेल का रे हसर्या ओठीला
लागले पंख प्रीतीला
रूप दर्पणी भिन्न दिसावे
हृदयमंदिरी तूच असावे
उपमा नाही तुझ्या नि माझ्या प्रेम संगतीला
लागले पंख प्रीतीला
या प्रतिमेची करीन पूजा
ह्या हृदयाचा तू तर राजा
तुझिया चरणी अर्पण करिते माझ्या भक्तीला
लागले पंख प्रीतीला
लागले पंख प्रीतीला
असेच भोळे असतील डोळे
केस कपाळी कुरळे कुरळे
रंग गुलाबी असेल का रे हसर्या ओठीला
लागले पंख प्रीतीला
रूप दर्पणी भिन्न दिसावे
हृदयमंदिरी तूच असावे
उपमा नाही तुझ्या नि माझ्या प्रेम संगतीला
लागले पंख प्रीतीला
या प्रतिमेची करीन पूजा
ह्या हृदयाचा तू तर राजा
तुझिया चरणी अर्पण करिते माझ्या भक्तीला
लागले पंख प्रीतीला
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | एम्. शफी |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | श्रीमंत मेहुणा पाहिजे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.