A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दाम करी काम येड्या

बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बगतो
पैशापायी माणूस मरतो, पैशावर जगतो

वासुदेवाची ऐका वाणी, जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम रे

पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय्‌ झेप पैशाच्या मागुनी धाव
जल्मापासनं सारी मानसं या पैशाची गुलाम रे

कुणी जुगार सट्टेबाज, कुणी खेळं मुंबई मटका
चांडाळचौकडी जमता कुणी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखुर सुटला, फेकला त्यानं लगाम रे

या कवडी-दमडीपायी कुणी राकुस घेई जीव
कुनी डाका दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे

नक्षत्रावानी पोरगी बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं शिरिमंतीनं हातात नाही छदाम रे

वाड्यात पंगती बसल्या लई आग्रेव जागोजाग
दारात भिकारी रडतो, पोटात भुकंची आग
संसाराचं ओझं घेऊन कुणी टिपावा घाम रे

नाचते नारीची अब्रू छनछुन्‍नक तालावरती
पैशानं बायको खूस, पैशानं बोलते पिरती
या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे