A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दैव किती अविचारी

दैव किती अविचारी
ऊधो! जीवनगति ही न्यारी!

शुभ्रवर्ण बगळ्यास दिला तू
कोकिळ तनु अंधारी
कृष्णलोचन सुंदर हरिणे
वनि वनि भ्रमति बिचारी!

मूर्ख भोगितो राजवैभवा
पंडित फिरत भिकारी
सूरदास विनवितो प्रभूला
क्षण क्षण हो जडभारी!
उद्धव (ऊधो) - वसुदेवाचा पुतण्या, कृष्णसखा.