A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दाता तोचि ह्मणावा

दाता तोचि ह्मणावा ।
नामावांचोनी नेणे जीवा ॥१॥

थोर तोचि ह्मणावा ।
नेणे भूताचा तो हेवा ॥२॥

लहान तोचि ह्मणावा ।
कायावाचा भजे देवा ॥३॥

एकाजनार्दनीं ह्मणे ।
देवावांचुनी कांहीं नेणे ॥४॥
गीत - संत एकनाथ
संगीत - स्‍नेहल भाटकर
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - संतवाणी
नेणणे - न जाणणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.