A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दे हाता या शरणागता

दे हाता या शरणागता ।
मदविलसितनदगता पंकयुता मुखमलिना धना हो त्राता ॥

संपदा चपलचरणा । आपदा भोगि नाना । परत ये पद्मसदना ।
कुवलय तव मुख तिला; अजि कमला विनवि तुला, मला घे आतां ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- छोटा गंधर्व
खाँसाहेब अब्दुल करीम खाँ
प्रभाकर कारेकर
सुरेश वाडकर
शरद जांभेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मानापमान
राग - आनंद भैरवी, मिश्र काफी
ताल-त्रिवट
चाल-'येरानासामी' या कानडी चालीवर.
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कमला - लक्ष्मी.
नद - मोठी नदी.
पंक - चिखल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  छोटा गंधर्व
  खाँसाहेब अब्दुल करीम खाँ
  प्रभाकर कारेकर
  सुरेश वाडकर
  शरद जांभेकर