देते तुला हवे ते
देते तुला हवे ते, देते दहा दिशा रे
नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे
हे मेघ घेउनी जा, जे कोष अमृताचे
हा मोर राहु दे तू त्यांचा परि पिसा रे
जा चंद्र घेउनी हा मज वाट दावणारा
संपेल चांदणीचा अभिसार हा कसा रे?
घे अंग कांचनाचे, घे रंग कुंतलांचे
हृदयात या सलू दे दु:खाचिया कुसा रे
घे एवढे, सभोवती मी राहणार नाही
होईन अमर परि मी पिउनी अशा विषा रे
नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे
हे मेघ घेउनी जा, जे कोष अमृताचे
हा मोर राहु दे तू त्यांचा परि पिसा रे
जा चंद्र घेउनी हा मज वाट दावणारा
संपेल चांदणीचा अभिसार हा कसा रे?
घे अंग कांचनाचे, घे रंग कुंतलांचे
हृदयात या सलू दे दु:खाचिया कुसा रे
घे एवढे, सभोवती मी राहणार नाही
होईन अमर परि मी पिउनी अशा विषा रे
| गीत | - | वसंत निनावे |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | अपर्णा मयेकर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| अभिसार | - | ठरविलेल्या जागी (प्रियकराचे) भेटणे किंवा अशी जागा. |
| कुंतल | - | केस. |
| कूस | - | कुसळ, गवताची किंवा लाकडाची टोकदार काडी. |
| कांचन | - | सोने. |
| तृषा | - | तहान. |
| पिसे | - | वेड. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












अपर्णा मयेकर