धरणी आईची माया
धरणी आईची माया
कशी जाईल वाया?
लई दिवसानं, लई नवसानं
लागलंय आभाळ गाया
वैशाख-वणवा सरला हो
मृगाचा पाऊस झरला हो
देवाची किरपा झाली
ही सुखात काया न्हाली
झुळझुळ पाणी पाटात
सुख मावंना पोटात
फुलून काळिज आलं
अन् हिरवं लेणं ल्यालं
घामाचं झालं मोती हो
लाखाची दौलत हाती हो
खळ्यांत पडली रास
आता सोन्याचा खाऊ घास
कशी जाईल वाया?
लई दिवसानं, लई नवसानं
लागलंय आभाळ गाया
वैशाख-वणवा सरला हो
मृगाचा पाऊस झरला हो
देवाची किरपा झाली
ही सुखात काया न्हाली
झुळझुळ पाणी पाटात
सुख मावंना पोटात
फुलून काळिज आलं
अन् हिरवं लेणं ल्यालं
घामाचं झालं मोती हो
लाखाची दौलत हाती हो
खळ्यांत पडली रास
आता सोन्याचा खाऊ घास
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | आशा भोसले, महेंद्र कपूर |
चित्रपट | - | फटाकडी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा |
खळे | - | शेत. |