धरणी मुकली मृगाच्या
धरणी मुकली मृगाच्या पावसाला
सुख माझे हरपले, कुठे शोधू ग भावाला?
अनंत गगनी तारका अगणित
तसे आठवू भावांचे गुण किती असंख्यात.
चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात
भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात.
देवाच्या देवळात गोड सनई वाजते
भाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते.
वार्याची झुळूक आणी सुगंध फुलांचा
सांग जिवाच्या मैत्रिणी गोड निरोप भावाचा.
सुख माझे हरपले, कुठे शोधू ग भावाला?
अनंत गगनी तारका अगणित
तसे आठवू भावांचे गुण किती असंख्यात.
चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात
भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात.
देवाच्या देवळात गोड सनई वाजते
भाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते.
वार्याची झुळूक आणी सुगंध फुलांचा
सांग जिवाच्या मैत्रिणी गोड निरोप भावाचा.
गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | शेवग्याच्या शेंगा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |