धिनक धिताम् ढोलक बोले
धिनक धिताम् ढोलक बोले मनातले बोल ग
विझता विझता रातीला पडे पैंजणांची भूल ग
पुनव रातीला जागर चाले
आभाळावरती चांदण झुले
झुलत झुलत गळून जाती मनातले सल ग
रात साजरी रात जागवी
आठवणींची रेघ लाघवी
जागत जागत ओटीत यावे प्राजक्ताचे फूल ग
जोगीण धावे जाराच्या मागे
गतकाळाचे पाशवी धागे
धावत धावत विणून जाई प्रारब्धाची वीण ग
विझता विझता रातीला पडे पैंजणांची भूल ग
पुनव रातीला जागर चाले
आभाळावरती चांदण झुले
झुलत झुलत गळून जाती मनातले सल ग
रात साजरी रात जागवी
आठवणींची रेघ लाघवी
जागत जागत ओटीत यावे प्राजक्ताचे फूल ग
जोगीण धावे जाराच्या मागे
गतकाळाचे पाशवी धागे
धावत धावत विणून जाई प्रारब्धाची वीण ग
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | भावगीत |
वीण | - | वस्त्राचे विणकाम. |
सल | - | टोचणी. |